हिंदी सक्तीचा निर्णय रद्द,तर शिक्षकांचे काम होणार कमी

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द,तर शिक्षकांचे काम होणार कमी

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला मिळाले यश….

महाराष्ट्र राज्यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली असल्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने काढला होता,तो तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी २२/४/२५ रोजी सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयात दिले होते,हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा साठेंनी राज्य सरकारला दिला होता.त्यानंतर शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी २२/४/२५ रोजी सायंकाळी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिल्याची घोषणा केली.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला यश मिळाले आहे.हिंदी भाषेच्या सक्तीला अनेक पक्षांनीही विरोध केला होता.त्यांचाही हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यामधे सिंहाचा वाटा असल्याचे किरण साठेनी सांगितले.

दिनांक ११/४/२५ रोजी शिक्षण मंत्री यांना निवेदन देवून शिक्षकांना शैक्षणिक व्यतिरिक्त दिले जाणारे काम बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती,त्यावर तात्काळ निर्णय न घेतल्यास २२/४/२५ रोजी मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.अशी माहिती पक्षप्रमुख किरण साठेंनी दिली.२२/४/२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी राज्यातील शिक्षकांची शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामे बाजूला करून इतर कामे कमीत कमी शिक्षकांना दिली जातील याची खबरदारी घेतली जाईल आणि तसे परिपत्रक काढणार असल्याची घोषणा केली,शिक्षकांना होणारा अतिरिक्त कामाचा त्रास आता कमी होणार असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला यश मिळाल्याने शिक्षकांना मोकळा श्वास घेता येईल असे पक्षप्रमुख किरण साठे यांनी सांगितले.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जात असून नवखा पक्ष असलेल्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या कामाचे कौतुक राज्यभर होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom