
माळशिरस,पुरंदावडे,सदाशिवनगर येथे मविसे पक्षाच्या शाखेचे अनावरण
गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता अभियानाला प्रतिसाद
प्रतिनिधी :-
गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता अभियानाला माळशिरस तालुक्यात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून सुरूवात करण्यात आली आहे.त्याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील माळशिरस,सदाशिवनगर,पुरंदावडे या तीन गावांमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे अनावरण पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते करण्यात आले.
गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी प्रदेश सचिव अनिल दादा साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख,धनाजी साठे,माळशिरस तालुका अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडागळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,उपाध्यक्ष दीपक कांबळे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजित माने,संघटक चेतन साठे,यांच्यासह सदाशिवनगर शाखेतील कार्यकर्ते व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.यश ओवाळ,भैय्या मोहिते, जयदीप ओवाळ,विठ्ठल भिसे, जयदीप अहिवाळे ऋतिक नवगिरे, पुष्फक भोसले,रितेश सावंत,अरविंद कांबळे, ज्ञानेश्वर चव्हाण,सचिन कांबळे,रोहन कांबळे,सोमनाथ धाईंज,अरमान मनेरी,सुरज कांबळे इत्यादी उपस्थित होते.