संजयनगर येथील डीपीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी,बहुजन ब्रिगेड आक्रमक.
कार्यकारी अभियंता यांच्याकडून तात्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना
प्रतिनिधी : अकलूज : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अकलूजचे कार्यकारी अभियंता श्री दत्तात्रय ओमासे यांना राष्ट्रवादी काँग्रेस,व बहुजन ब्रिगेडच्या वतीने माळेवाडी संजयनगर येथील लाईट चा डीपी त्वरित बसविण्यात यावा या आणि तेथील डीपी बंद पडण्याचा प्रकार कायमचा बंद करून जनतेला विना अडचण लाईट उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,काँग्रेस मागासवर्गीय आघाडीचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,काँग्रेस पक्षाचे अकलूज पक्षाचे शहराध्यक्ष नवनाथ साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष बंडू कांबळे,माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश साठे,आनंद मिसाळ,सोमनाथ लोखंडे,रहीम शेख,जीवन साठे,जावेद बागवान,जुबेर बागवान व असंख्य जण उपस्थित होते.त्यावर तात्काळ डीपी बसविण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,बहुजन ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला दिले आणि कामाला सुरुवात करण्यात आली.त्यामुळे माळेवाडी संजय नगर अकलूजमधील जनतेला दिलासा मिळाला असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.
