कार्यकारी अभियंता श्री बोडके यांच्या कार्यालयासमोर ३१ तारखेला बहुजन ब्रिगेडचे तीव्र आंदोलन
प्रतिनिधी : फलटण : NRBC च्या माळशिरस उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बिजवडी येथील कॅनॉलच्या हद्दीतील मे महिन्याच्या ८ ते १४ तारखेच्या दरम्यान बेकायदेशीररित्या एका ठेकेदार असलेल्या व्यक्तीने मुरूम उपसा केला असून त्याची चौकशी करून तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संबंधित प्रकरणात जबाबदार अधिकारी यांनी काही बेकायदेशीर काम केले असेल तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी कार्यकारी अभियंता श्री बोडके यांच्याकडे केली आहे.
माळशिरस उपविभागाचे अभियंता अमोल मस्कर यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून पंचनामा केला असून संबंधित ठेकेदार असलेल्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये आहे, तसेच संबंधित प्रकरण मिटविण्यासाठी उपविभागीय अभियंता अमोल मस्कर यांनी संबंधित प्रकरणात दोशी असलेल्या ठेकेदाराकडून नारळाची रोपे घेऊन प्रकरण दाबले असल्याची माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये जोरदार चर्चा असल्याचे निवेदनात म्हटले आहे,तसेच बेकायदेशीर मुरूम उपसा करणाऱ्या ठेकेदार व्यक्तीवर कारवाई करून हे प्रकरण दाबणाऱ्या उपअभियंता अमोल मस्कर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी कार्यकारी अभियंता श्री बोडके यांच्या फलटण येथील कार्यालयासमोर दिनांक ३१ मे रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.
