अकलूजमधील विविध मागण्यांसाठी बहुजन ब्रिगेड संघटना आक्रमक

अकलूजमधील विविध मागण्यांसाठी बहुजन ब्रिगेड संघटना आक्रमक

शहराध्यक्ष उदय कांबळे यांचा सा.बा.चे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी : अकलूज : बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे कार्यकारी अभियंता यांना बहुजन ब्रिगेडचे युवा आघाडीचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.सदर निवेदन उपकार्यकारी अभियंता मोनिका धायतडक-खाडे यांनी स्वीकारले आहे.

अकलूज शहर भागातील सर्व मोठ्या रस्त्याच्या कडेच्या काही गटारी दुरुस्त/नवीन करणे,आझाद चौक ते प्रतापसिंह चौक गटार दुरुस्त/नवीन व मोठ्ठी करणे
सारनाथ बुद्ध विहार ते S.M.M कॉलेज जाणारा बाय पास शेवट पर्यंत नविन मोठ्ठी भुयारी गटार बांधणे.प्रतापचौक ते महर्षि चौक पर्यंत गटार दुरुस्त/नवीन करणे, या मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकलूज मधील रस्त्या कडील गटारिंन कडे दुर्लक्ष असल्यामुळे.गटारिंची दुरवस्था झाली असून अकलूजच्या नागरिकांना गटारीचा दुर्गंधीचा,घाण पाण्याचा त्रास होत आहे.गटारींची दुरवस्था झाल्यामुळे पावसाळ्यात त्यातील घाण पाणी सर्व रस्त्यावर व नागरिकांच्या घरा मध्ये जात आहे.तरी आपण सबंधित विभाग प्रमुखाला पावसाळ्याच्या आत अकलूज मधील सर्व गटारींची पाहणी करून गटारींची कामे करावे ही विनंती.तरी आपण लवकरात-लवकर त्या गटारीचे दुरुस्ती/नवीन काम करून घ्यावे ही विनंती.आणि आमच्या या विषयाची दखल न घेतल्यास बहुजन ब्रिगेडच्या वतीने अकलूज मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर लोकशाहीपद्धतीने दि.14/06/2022 या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात येईल.असा इशारा उदय कांबळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom