वेळापूर शहरात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
प्रतिनिधी : वेळापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या उपस्थित वेळापूर येथे जाहीर मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चालू असून त्यासंदर्भात लवकरच कार्यक्रमाची तारीख जाहीर केली जाणार आहे.
माळशिरस तालुक्यातील प्रदेश पातळीवर असलेले पदाधिकारी तसेच जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर असलेल्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अकलूज मध्ये बैठक घेण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी,मंत्री,प्रदेशाध्यक्ष,खासदार,यांची वेळ घेवून लवकरच कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चालू असल्याची माहिती मिळाली आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणारे उत्तमराव जानकर यांना वगळून तालुक्यातील जानकर यांच्या विरोधात काम करणारा गट मोठा कार्यक्रम वेळापूर येथे घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या कार्यक्रमाला उत्तमराव जानकर यांना वगळण्यात येणार आहे अशीही चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये सुरु आहे.
