अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन दिमाखात संपन्न
प्रतिनिधी : : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनरल बॉडीच्या अकलूज शहर शाखेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकर देशमुख,सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे सर देशमुख, जिल्हा संघटक मदन देशमुख माळशिरस तालुका अध्यक्ष माणिक वाघमोडे युवक तालुका अध्यक्ष बाबा माने,मोहनानंद ओव्हाळ महाराज,सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष तसेच वेळापूर ग्रामपंचायतचे सरपंच रजनीश बनसोडे,यांच्या उपस्थितीत पार पडले,शाखेच्या बोर्डाची फित भानुदास सालगुडे यांच्या हस्ते कापण्यात आली.
कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका उपअध्यक्ष जाकीर शेख,युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख,अकलूज शहर उपाध्यक्ष इरफान बागवान, कार्याध्यक्ष सचिन जाधव,सचिव शब्बीर शेख,हनुमंत पाटोळे,शाहरुख शेख,फरीद बागवान,सरफराज बागवान,विकास केसकर,रफिक मुलाणी,राजू अडगळे,नितीन कांबळे,श्याम जाधव,बाळू जाधव,किशोर तुपसौंदर,दत्तात्रय कांबळे,अनिल साठे,मारुती साठे,किशोर खंडागळे,दादा मोहिते,बापू साठे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांनी केले.

