अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ब्लॅंकेट,स्वेटर वाटप
अकलूज आणि परिसरात असलेल्या बेघर-मतीमंद,गरीब, वयोवृद्ध आणि ऊसतोड मजूर- लहान मुलांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अकलूज शहराच्या वतीने शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांनी ब्लॅंकेट/स्वेटर वाटप केले.
कडाक्याच्या थंडीत बेघर/ मतीमंद लोक बस स्टॅन्ड,अकलूजच्या प्रत्येक चौका-चौकात, मंदिराच्या आवारात झोपलेले असतात. त्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी बॅंकेट/ स्वेटर वाटप करण्यात आले.
समाजसेवेचा वसा उराशी बाळगून अतिशय जोमाने स्वतःला झोकून देवून अविनाश सोनवणे हे काम करीत आहेत,त्यांच्या कामाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख यांनी कौतुक केले आहे.तसेच जनतेतूनही सोनवणे यांच्या कामाचे कौतुक केले जाते आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष – अविनाश भैय्या सोनवणे, युवा पॅंथरचे – लखन पवार, सामाजिक कार्यकर्ते- आकाश भाऊ धाईंजे, सुरज महाजन, वैभव बनकर उपस्थित होते…
