वार्ड नंबर 1 मध्ये सत्ताधारी गटाने खबऱ्याला उमेदवारी दिल्याची खमंग चर्चा
प्रतिनिधी—अकलूजमधील ग्रामपंचायत च्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या माध्यमातून वार्ड नंबर 1 मध्ये एका खबऱ्याला उमेदवारी दिल्याची खमंग चर्चा संपूर्ण वार्डात पाहायला मिळत आहे.
खबऱ्या उमेदवाराने स्वतःचा नातेवाईक असलेल्या व्यक्तीच्या ही चाड्या लावण्याचे काम केले, संबंधित खबऱ्या उमेदवार हा आपल्या नेत्याला संपूर्ण गावातील विरोधी पक्षाच्या लोकांचे रेकॉर्डिंग,व्हिडिओ,फोटो काढून दाखविण्याचे काम करीत असल्याने त्यांला त्याच्या नेत्याने आपल्या मर्जीतील खबऱ्या म्हणून त्याला वार्ड नंबर 1 मधून उमेदवारी दिली आहे,आपल्या नेत्याला खबऱ्या देऊन अनेकांचे संसार उदवस्त केलेले आहेत,आपल्या पाठीवर शाबासकी मिळावी यासाठी कोणत्याही प्रकारच्या खोट्या खबऱ्या देऊन आपल्या नेत्यांचे समाधान करणाऱ्या खबऱ्याला उमेदवारी दिल्याने वार्ड नंबर 1 मध्ये जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
