बहुजन ब्रिगेड संघटनेच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरसाळे गावामध्ये त्यांचा सत्कार.
गुरसाळे–प्रतिनिधी –बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष
किरण साठे यांच्या हस्ते व बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार बहुजन ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नानासाहेब खंडाळे याची निवड झाल्याबद्दल श्री रामेश्वर माने मित्र मंडळ गुरसाळे यांच्या वतीने सत्कार घेण्यात आला होता. यावेळी सरपंच दीपक शेठ शिंदे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री रामेश्वर माने ,श्री लहुराज घुटुकडे विजय चव्हाण ,अमर कोळेकर, जयराम नेहतराव ,भगवंत पाटील राहुल इंगळे, महेश माने, अशोक आरकिले ,अक्षय कोळवले ,कैलास फडतरे ,औदुंबर घाडगे, राजाभाऊ मोटे ,प्रकाश चळेकर ,दादा देवकते ,समाधान भांगे उपस्थित होते .
बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी त्या वेळी बोलताना सांगितले .
