रा.महा.९६५ साठी जागा संपादित केलेल्या लोकांच्या पत्रा शेडची नुकसानभरपाई देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

रा.महा.९६५ साठी जागा संपादित केलेल्या लोकांच्या पत्रा शेडची नुकसानभरपाई देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

प्रतिनिधी—अकलूज—उपविभागीय अधिकारी
माळशिरस विभाग अकलूज
यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मौजे मांडवे गट नंबर ११५७/१ मधील संपादित क्षेत्रातील शेडचे नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

माळशिरस तालुक्यातील मांडवे गावाच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ९६५ या साठी संपादित केलेल्या संबंधित गट नंबर मधील अनेकांना शेतीचे पैसे मिळाले आहेत,मात्र संबंधित गट नंबर मधील लोकांना त्यांच्या पत्रा शेडचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना त्यांची नुकसानभरपाई त्वरित देण्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे, तसेच ही नुकसानभरपाई त्वरित न दिल्यास संबंधित लोकांना बरोबर घेऊन ८ मार्च रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom