पं.स.मधील दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसला आश्वासन
प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस पंचायत समितीच्या बांधकाम परवाना व ग्रामसेवक यांच्या बदल्याची व सजा ची चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याचा अहवालामध्ये चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांना निवेदन देऊन केली आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांना माळशिरस पंचायत समितीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी व तसेच माळशिरस तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामसेवक यांच्या बदल्यांची व मुख्यालय येथे असलेल्या ग्रामसेवक यांना इतर गावाचा का सजा दिला नाही याचीही चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते,त्याची दखल घेऊन दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी श्री बेळळे यांची नेमणूक करण्यात आली होती,श्री बेळळे यांनी दोन्ही प्रकरणाची चौकशी झाली असल्याचे सांगितले आहे,तसेच ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्यकार्यकारी अधिकारी सौ चंचल पाटील मॅडम यांच्याकडे अहवाल सादर केला असल्याचे सांगितले आहे,त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटून या दोन्ही प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे,त्या मागणीची दखल घेऊन श्री स्वामी साहेब यांनी लवकरच या जबाबदार असणाऱ्या व दोषी आढळणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले आहे.
माळशिरस तालुका पंचायत समितीच्या जबाबदार अधिकारी या दोन्ही चौकशी अंती दोषी आढळणार असून लवकरच सत्य जनतेच्या समोर येणार आहे, संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी ही लढाई सुरू ठेवणार आहे.
किरण साठे–सरचिटणीस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अध्यक्ष-बहुजन ब्रिगेड संघटना
