अकलूज-पंढरपूर रस्त्यावरील नाका नंबर एक येथील कामाला सुरुवात

अकलूज-पंढरपूर रस्त्यावरील नाका नंबर एक येथील कामाला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश,,,

प्रतिनिधी—अकलूज—अकलूज पंढरपूर रस्त्यावरील नाका नंबर एक येथील ताम्हाणे ऑटोमोबाईल समोरील रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यासाठी उपाययोजना त्वरित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूज ग्रामपंचायतला २६ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख उपस्थित होते.

अकलूज पंढरपूर रस्त्यावरील नाका नंबर एक येथील ताम्हणे ऑटोमोबाईल समोरच्या पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर गटारीतील पाणी साचत असून त्या ठिकाणी अनेकांचे अपघात झाल्याचे दिसून आले आहे,तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाकडे या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम असून त्यांनी अनेकवेळा हे खड्डे बुजविले आहेत मात्र या गटारीतील पाणी त्या ठिकाणी साचत असल्याने पुन्हा त्याठिकाणी खड्डे पडत आहेत,संबंधित गटार ही ग्रामपंचायत अकलूज यांच्यामार्फत बांधण्यात आली आहे,त्यामुळे अकलूज ग्रामपंचायत ने या रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची व्यवस्था त्वरित करून ते पाणी रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ज्यांच्या पाण्यामुळे गटारी तुंबल्या आहेत त्या हॉटेल चालकांवर त्वरित कारवाई करावी तसेच या रस्त्यावर पाणी येणार नाही याची उपाययोजना येत्या आठ दिवसांत न केल्यास ग्रामपंचायत च्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने अकलूज ग्रामपंचायतच्या वतीने हे काम त्वरित चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते,आणि संबंधित कामाला प्रत्येक्षात सुरुवात केली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश मिळाले असून आता या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवासधारकांना या पाण्याची अडचण होणार नाही, आणि यापुढे अपघात होणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom