
राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने ६७ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू वाटप
प्रतिनिधी—लॉक डाउन व संचारबंदी मुळे सर्वसामान्य जनतेला हाताला काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे,त्यांना मदतीचा हात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी ६७ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने २३ एप्रिल रोजी अकलूजमधील आण्णाभाऊ साठे नगर,माळेवाडी (अ) येथील शिवाजी नगर येथील गरजू,गोरगरीब,निराधार,ज्यांना रेशनकार्ड नाही व खरोखरच ज्यांना गरज आहे,आशा ६७ कुटुंबाना पाच किलो गहू,तीन किलो तांदूळ,अर्धा किलो तूर डाळ,अर्धा किलो मूग डाळ,एक किलो गोड तेल,एक किलो हरभरा डाळ,एक किलो साखर,अंगोळीचा एक साबण,कपडे धुण्याचा एक साबण प्रत्येकी एका कुटुंबाला वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ६७ कुटुंबाला ह्या जीवनावश्यक वस्तू वाटप स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी किरण साठे,उदय कांबळे,सोमनाथ शेळके,बंडू कांबळे उपस्थित होते.