
प्रसिद्धी साठी नको तर शास्त्र शुद्धतेनेच कोरोना विरोधातील लढाई लढता येईल ,,,
ऍड अविनाश काले अकलूज 9960178213
कोरोना विरोधातील लढाई लढत असताना त्याचे विरोधात अजून ही माणसाच्या हातात लशी सारखे प्रभावी हत्यार उपलब्ध नाही त्या मुळे ही लढाई डिफेनसिव्ह अर्थात संरक्षणात्मक अशी आहे ,,
कोरोनाच्या वारापासून स्वतः चे व स्वतः च्या कुटुंबाचे रक्षण करण्या साठी सोशल डीस्टीक्षण हेच महत्वाचे हत्यार आहे ,,त्यासाठी आपणास इतरांपासून अंतर राखवेच लागणार आहे ,,व सार्वजनिक सेवे चा ही वापर जपून व स्वछता पाळून करावा लागणार आहे ,त्या साठी व्यक्तिगत स्वच्छता म्हणून स्यनीटायझर चा वापर अनिवार्य आहे ,,
अशास्त्रीय पद्धतीने सोडियम चा वापर करून केलेले मानवी शरीरावरील फवारे हे त्वचा आणि डोळे या साठी अपायकारक असल्याचे सिद्ध झाले आहे ,आणि त्या फवाऱ्यातून बाहेर आल्या क्षणी कोरोना व्हायरस केव्हांही झडप घालू शकतो ,,
कोरोना ला आळा घालण्या साठी लॉक डाऊन हे हत्यार पुढे आले ,,ते आवश्यक होते ,व आहे ही परंतु लॉक डाऊन च्या ही मर्यादा आहेत तुम्ही सरसकट जीवनाला दीर्घकाळ थांबवू शकत नाही ,,
याचा अतिरेक मानवी जीवनाचे अर्थचक्र उध्वस्त करेलच परंतु भविष्यातील जीवन ही संपवून टाकेल ,,बाहेर कोरोना आणि आतून भूकमरी ,अश्या दोन शत्रू विरोधात ही लढाई लढावी लागेल , ज्यांच्या कडे पैसे आहेत ते ही कुपोषनाची शिकार बनतील ,,
आपण फार जबाबदार नेते आहोत हे दर्शवण्या साठी शासकीय लॉक डाऊन असताना ही गाव पातळीवर जनता कर्फ्यु पुकारणारी मंडळी ही अलीकडे वाढू लागली आहेत ,,कोणी 1 दिवसाचा तर कोणी अतिरेक करीत 3 दिवसाचा सरसकट जनता कर्फ्यु पुकारत आहेत ,,
कोरोना विरोधातील लढाई ही दीर्घकालीन चालणारी लढाई आहे याचे भान त्यांना राहिलेले नाही ,
कोणत्याही लढाईत राखीव सैन्य ठेवलेले असते ,ते लढाईच्या काळात ही विश्रांती घेत असते ,याचे कारण पहिली फळी दमली की ती न दमलेली फळी मैदानात उतरते ,,
सरसकट लॉक डाऊन मुळे आपण आपला सारा समाज एकाच वेळी लढाईत झोकून दिलेला आहे ,,आणि आता तो पोलीस,डॉक्टर ,नर्स, सफाई कर्मचारी,साऱ्यांना दमवून टाकत आहे ,,
समाज ही पूर्णतः मेटाकुटीला आलेला आहे ,,शेतकरी उद्धवस्थ झालेलाच आहे ,बांधकाम मजूर आणि श्रमिक जनता उध्वस्त झाली आहे ,,त्यांचे हाताला काम नाही आणि कुटुंबे जीवनावश्यक बाबीला मोताद झालेली आहेत ,,
फार अशी जाहिरात बाजी न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांचे नेते गण तालुका व गाव पातळीवर जनतेला ठोस अशी मदत करीत आहेत ,,
कोरोना समन्वय कक्ष काढले गेले आहेत ,,
सांगोला तालुक्यात मा दीपक आबा नी कोट्यवधी रुपयांचे जीवनावश्यक सामान जनतेला पुरवले आहे ,तर माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी स्वतः च्या खर्चातून जनतेला आवश्यक असे वितरण केले आहे ,,राष्ट्रवादीचा छोटा कार्यकर्ता ही जसे की ,किरण साठे ,अजय सकट ,(पंचायत समिती सदस्य,माळशिरस तालुका )हे अहोरात्र झटत आहेत ,,पक्षभेद न करता आपलीच जनता आहे असे समजून त्यांनी आपल्या स्तरावर केलेली मदत ही लाख मोलाची आहे ,,कोरोना समन्वय कक्षा द्वारे शेतकरी बांधवाकडुन गोळा केलेला शेती माल कांदे ,गहू ,भाजीपाला ,,डाळ इत्यादी चे वाटप जोरकस चालू आहे ,मागेल त्याला जेवणाचा डबा ही संकल्पना राबवली जात आहे ,के पी काळे विझोरी ,डॉ तुकाराम ठवरे , जी प सदस्य ,बाळासाहेब धाइंजे ,जन नेते विकास दादा धाइंजे ,अशी मंडळी अपार शक्ती एकवटून कोरोना विरोधातील लढाईत जनतेला आवश्यक ती ऊर्जा पुरवत आहेत ,,,ते डॉ कुमार लोंढे व डॉ पंचशीला लोंढे हे ग्रामीण भागात आपली वैद्यकीय सेवा पुरवत आहेत ,, या साऱ्यांना मी नमन करतो ,,
हे लोक जाहिराती साठी किंवा आपले नेतृत्व दर्शवण्या साठी अनाठायी जनता कर्फ्यु लोकांवर लादत नाहीत तर लॉक डाऊन मुळे आलेल्या जनतेच्या उपसमारीवर पक्षभेद विसरून उपाययोजना करीत आहेत ,,
ते जनतेत आहेत आणि जनतेच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढत आहेत ,,त्यांना शोधण्यासाठी डोळे ही पुरेसे आहेत ,,ते निवेदनातून शोधावे लागत नाहीत ,,
महाराष्ट्राच्या पातळीवर ,मा ना अजितदादा पवार साहेब ,मा ना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ,आरोग्य मंत्री मा ना राजेशजी टोपे साहेब हे जीवाचे रान करीत आहेत ,,या खऱ्या नेत्यांना साथ देऊया ,,व कोरोना ला हरवूया,,,,, हीच विनंती ,,,
आपला ऍड अविनाश काले
जय हिंद जय महाराष्ट्र ,जय राष्ट्रवादी,,,