
सोलापूर शहरात चार दिवस होणार होम टू होम सर्वे पालकमंत्री दत्तात्रय भरणे
प्रतिनिधी-सोलापूर
आज दुपारपर्यंत आणखीन चार कोरोना रुग्णांची वाढ झाली असून येत्या चार दिवसात शहरातील होम टू होम सर्वे करण्याच्या सूचना नूतन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत कोरोना विषाणू बाबतचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सोलापूर शहरातील होम टु होम सर्वे होणे गरजेचे असून याकरिता योग्य ती खबरदारी घेऊन महापालिका यांच्यासोबत जिल्हा परिषदेची 300 ते 400 जणांची टीम तयार करणार आहे यासाठी सर्व सोलापूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले पुढे बोलताना त्यांनी 27 एप्रिल पर्यंत होम टु होम सर्वे होईपर्यंत संचारबंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.