राष्ट्रवादीकडून भाजपला दिवाळीचे फटाके; भाजपात गेलेले नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार?

October 24, 2021 

राष्ट्रवादीकडून भाजपला दिवाळीचे फटाके; भाजपात गेलेले नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार?

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडल  दोनवेळा भेट दिल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आता पिंपरीपाठोपाठ शरद पवार यांनी पुण्यात लक्ष घातलं आहे.

पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी विशेष लक्ष घालणार असून दिवाळीच्या एक दोन दिवसानंतर आजी-माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजपमध्ये गेलेले पुण्यातील नगरसेवक जवळपास 18 ते 19 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत. याबाबतचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज केला.

दरम्यान, भाजपात गेलेले नगरसेवकांचा पक्षात भ्रमनिरास झाला आहे. त्यांना सापत्नक वागणूक दिली जात आहे. भाजपच्या जुन्या नगरसेवकांना अधिक महत्त्व दिले जात आहे. निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याने या नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले जवळपास 18 ते 19 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom