धैर्यशील मोहिते पाटील यांचे वक्तव्य बालिशपणाचे–किरण साठे

धैर्यशील मोहिते पाटील यांचे वक्तव्य बालिशपणाचे–किरण साठे

प्रतिनिधी : अकलूज :
सोलापूर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का असा प्रश्न भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित केला होता.तसेच सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे 79 हजार 440 शेतकर्‍यांच्या 67 हजार 194.39 हेक्टर क्षेत्राला फटका बसला. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी 60 कोटी 18 लाख 1 हजार 945 रुपयांची नुकसानभरपाई मिळावी,असा प्रस्ताव शासनाला पाठवला होता.असेही म्हटले होते.

मात्र राज्य शासनाने अतिवृष्टी बाधित नुकसान भरपाईच्या यादीतून सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांना वगळले सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हे शेतकरी नाहीत का, त्यांना का वगळले ?असा बालिशपणाचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला होता.अपुऱ्या माहितीच्या आधारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलेचे तारे तोडणारे वक्तव्य केल्याचे दिसून आले आहे.असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना लगावला आहे.

जून ते ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेती पिकांसह काही ठिाकाणी वीज, भिंत अंगावर पडून काही जणांना प्राणही गमवावे लागले होते काही ठिकाणी जनावरे दगावली
जिल्ह्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हाता तोंडाला आलेली पिके ऐन काढणीवेळी पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे,अतिवृष्टी बाधित शेतक-यांचे प्रशासनाने पंचनामे करून व मदतीचा प्रस्ताव राज्यशासनास पाठवून देखील संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने वा-यावर सोडले आहे असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले होते, मात्र शासनाच्या कार्यवाहीची कोणत्याही प्रकारची माहिती न घेता असे बिनबुडाचा आरोप केला केला असल्याचे साठे यांनी त्यांना उत्तर देताना म्हटले आहे.

शेतक-यांच्या प्रति संवेदना शून्य व बोथट झालेल्या राज्य शासनाने तत्परता दाखवावी व राज्यातील इतर शेतक-यांच्या प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई त्वरीत मिळावी असेही भाजपचे संघटन सरचिटणीस यांनी नमूद केले होते,यावर धैर्यशील मोहिते पाटील यांना या मदतीतून सोलापूर जिल्ह्याला वगळले आहे याची माहिती कुणी दिली आणि कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे व त्यांना दिलेली माहिती ही खरी की खोटी याची खातरजमा न करता अशी बेताल वक्तव्य करताना जबाबदारीने माहिती घेऊन अशी वक्तव्य करायला पाहिजेत,असा सवाल साठे यांनी उपस्थित केला आहे.दिनांक २९/११/२१ रोजीच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ६०२२.०६ लक्ष एवढी रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामध्ये अनुदान वाटप करण्याची संपूर्ण कार्यवाही उपविभागीय अधिकारी यांनीच करण्याचे आदेश दिले आहेत,त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी बाधित नुकसान भरपाईच्या यादीतून वगळले असे म्हणणे बालिशपणाचे लक्षण आहे.अशी खरमरीत टिका काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून करून त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom