राष्ट्रवादी मध्ये हुकमी एक्का असलेल्या कुटुंबातील सदस्यांची भाजपमध्ये नोकरसाराखी अवस्था
पुणे पॅटर्न प्रतिनिधी
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील नामांकित असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी वापर केला असल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे हुकुमी एक्का म्हणून काम करण्याची संधी माळशिरस तालुक्यातील नामांकित कुटूंबाला दिली होती मात्र त्यांनी शरद पवार अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून पळवाट शोधली आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे सोलापूर जिल्ह्यातील जनतेने पहायले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना अनेक पदे दिली मात्र त्याची जाणीव माळशिरस तालुक्यातील नामांकित असलेल्या कुटुंबातील सदस्यांना राहिली नाही.पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील निर्णय प्रक्रियेत माळशिरस तालुक्यातील नामांकित कुटूंबाला महत्वाचे स्थान दिले होते,यांचा विचार घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेतला जात नव्हता.मात्र कुठे माशी शिंकली आणि नामांकित कुटुंबातील सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर नामांकीत कुटुंबातील सदस्यांची आज मोठया प्रमाणात हेळसांड होत असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यातील जनतेमध्ये होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना सोलापूर जिल्ह्याचा हुकमी एक्का म्हणून ओळख असलेल्या नामांकित कुटुंबातील सदस्यांची अवस्था ना घर का ना घाट का ? अशीच झाली असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना मालक असल्याचा अविरत भावामध्ये वावरणाऱ्या नामांकित कुटुंबातील सदस्यांची भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर नोकर असल्यासारखी अवस्था झाली असल्याची चर्चा जनतेतून सुरू आहे.