राज्य पातळीवर असलेला नेता फक्त मोठेपणात दंग
सोलापूर जिल्ह्यात पक्षाला रिझल्ट देण्यासाठी अपयशी ठरलेला नेता
प्रतिनिधी : पंढरपूर : एका पक्षाचा राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग,माढा तालुक्यातील माढा,माळशिरस तालुक्यातील,माळशिरस,नातेपुते, म्हाळुंग या नगरपंचायतीच्या निवडणुका चालू झाल्या असून हा नेता फक्त लोकांना खोटी आश्वासन देवून भूलथापा मारून स्वतःच्या मोर्चाला बोलावून त्यांना दिलेल्या आश्वासने पूर्ण करीत नाही अशीच चर्चा राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या स्वतःच्या तालुक्यातील बचत गटाच्या महिलांमधून बोलले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत स्वतः नेता असलेल्या पक्षाचे किती उमेदवार निवडणूक लढवीत आहेत याची माहिती वरिष्ठ पदाधिकारी यांना व पक्षाचे अध्यक्ष यांना खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले आहे.अडचणीत असलेल्या विविध प्रकारच्या लोकांना तुमचे काम मोर्चा झाल्यानंतर होणारच असे आश्वासन देवून मोर्चा काढल्याचे मोर्चामध्ये सामील झालेल्या जनतेमधून बोलले जाऊ लागले आहे,हा राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत किती उमेदवार पक्षाकडून उभे आहेत ? असा सवाल त्यांच्याच पक्षामध्ये नाराज कार्यकर्त्याकडून उपस्थित केला जात आहे.त्यामुळे राज्य पातळीवर असलेला नेता हा समाजाची फसवणूक करून अडचणीत असलेल्या लोकांचे भांडवल करून स्वतःची पोळी भाजून घेतात अशी कुजबुज त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे.स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष यांना खुश करण्यासाठी हा देखावा करून पक्षाचा अध्यक्ष यांची दिशाभूल होऊ शकते मात्र जनतेमध्ये ह्या नेत्याच्या शब्दाला किती किंमत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,त्यामुळे बचत गटाच्या महिलांचे नुकसान केलेल्या नेत्याला स्वतःच्या तालुक्यातील जनतेमधून शिव्यांची लाखोली वाहली जात आहे.सतत स्टंट करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय या राज्य पातळीवर असलेल्या नेत्याला लागली आहे,पक्षाला रिझल्ट देण्यास मात्र अपयशी ठरलेला राज्य पातळीवर असलेला नेता येणाऱ्या स्वतःच्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाला किती जागा मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
