म्हाळुंग नगरपंचायत निवडणूक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुसाट,मोहिते पाटील यांना भाजपचा दणका

म्हाळुंग नगरपंचायत निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुसाट,,,

मोहिते पाटील यांना भाजपचा दणका,,,

प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग नगरपंचायतच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद चे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना व त्यांच्या घरातील भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या मंडळींना भारतीय जनता पक्षाने जोरदार दणका दिला असल्याची चर्चा म्हाळुंग व तालुक्यातील जनतेमध्ये जोरदार सुरु झाली आहे.

म्हाळुंग नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील समर्थक यांचा अपक्ष पॅनेल उभा केला असून त्यांच्या निवडणुकीच्या बॅनरवरती मोहिते पाटील यांचे फोटो दिसत आहेत.भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या जाहिरातीमध्ये मोहिते पाटील यांचा कुठेही फोटो दिसून येत नाही.

एककीकडे राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीने म्हाळुंग नगरपंचायतची निवडणूक लढवीत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुसाट असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या मोहिते पाटील यांची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे ए बी फॉर्म हे मोहिते पाटील गटाला मिळाले नाहीत तर दुसऱ्या गटाला फॉर्म देण्यात आल्याने त्यांचे पक्षात काय अस्तित्व आहे,हे तालुक्यातील जनतेला कळून चुकले आहे.भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांच्या गटाला ए बी फॉर्म न देता दुसऱ्या गटाला फॉर्म दिल्याने मोहिते पाटील यांना जोरदार धक्का बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom