अकलूज नगरपरिषद बांधकाम विभागप्रमुख जाधव यांचेवरती कारवाईची मागणी
अकलूज/प्रतिनिधी:- अकलूज नगरपरिषद मध्ये कार्यरत असणारे बांधकाम विभागप्रमुख आनंद जाधव यांचेवरती दप्तर दिरंगाई व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी केली आहे .
मुख्याधिकारी धैर्यशील जाधव साहेब यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे की अकलूज शहरातील गांधी चौक, प्रतापसिंह चौक, अशोक चौक येथे सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देणेबाबत दि.26/10/21 रोजी निवेदन दिले होते परंतु यावरती सेवा हमी कायद्या नुसार कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे सदर कर्मचारी जाधव हे दप्तर दिरंगाई कायद्याने महाराष्ट्र नागरिक सेवा (सेवा आणि शिस्त) नियम 1979 अन्वये शिस्तभंग व दप्तर दिरंगाईची करवाई करण्याची मागणी महेश शिंदे यांनी केली आहे.यावेळी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, मानव सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल माने, युवा नेते फारुख शेख व इतर उपस्थित होते.
