माळशिरस तालुक्यामध्ये मातंग समाजाने नोटा ला मतदान करावे:- सचिन रणदिवे
प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस तालुका युवक अध्यक्ष सचिन रणदिवे मातंग नवनिर्माण सेना आज या उभ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्यातीलच एक म्हणजे सोलापूर जिल्हा एक ऐतिहासिक व क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि अशा या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे दोन मतदारसंघ माळशिरस मतदारसंघ व मोहोळ मतदार संघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातीला आरक्षित जागा असतानाही कोणत्याही राजकीय पक्षाकडून जाणून-बुजून मातंग समाजाचा एक ही उमेदवार दिला गेला नाही मातंग समाज या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्राची उभारणी करण्यासाठी आण्णाभाऊ साठे यांच्या सारखे महापुरुषांचे प्रचंड मोठे योगदान असताना देखील आज त्यांचे वारसदार असलेल्या मातंग समाज आजही या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये या राजकीय पक्षांनी व राजकीय नेत्यांनी उपेक्षित ठेवला आहे आणि म्हणून मातंग समाज अनेक योजना व सोयीसुविधांपासून वंचित राहिला आहे कारण त्यांचा कोणताही प्रतिनिधी आज मंत्रिमंडळात पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही आणि म्हणून मातंग समाज आणि ज्या मतदारसंघांमध्ये त्यांना जागा आरक्षित असतानादेखील त्यांना उमेदवारी दिली गेली नसल्यामुळे प्रचंड अशी नाराजी मातंग समाजामध्ये आहे आणि म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये व मोहोळ मतदारसंघांमध्ये मी माझ्या तमाम मातंग नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व समाज बांधवांना माझ्या माता बंधू भगिनींना विनंती करतो की कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणुकीमध्ये दखल घेतली नाही आज माळशिरस तालुक्यामध्ये व माळशिरस व मोहोळ या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचंड मोठी ताकद असतानाही मातंग समाजाच्या मतदानावरती एखाद्या उमेदवार जिंकू किंवा हारु शकतो अशी परिस्थिती असताना देखील निर्णयक असलेला मातंग समाजाकडे जाणून-बुजून जाणीपूर्वक जातीय दृष्ट्या दुर्लक्ष केले जाते आणि म्हणून मातंग समाज पेटून उठला आहे मी मातंग नवनिर्माण सेना युवक अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी तमाम मातंग समाजाला व माळशिरस व मोहोळ तालुक्यातील पदाधिकारी यांना सूचना व विनंती करतो की आज आपण या ठिकाणी 21 तारखेला नोटाच बटन दाबून नकारार्थी मतदान येणाऱ्या विधानसभेमध्ये करावे. अशी आपल्याला विनंती करतो आपला मतदानाचा लोकशाहीचा हक्क बजवावा मी मतदान करू नका असे म्हणणार नाही पण आपण आपली लोकशाही व जो राष्ट्रीय उत्सव आहे तो अधिकार आपण बजवावा येणाऱ्या उमेदवार किंवा राजकीय पक्षांना मातंग समाज काय असतो त्याचे अस्तित्व दाखवून देऊ हे येणाऱ्या काळामध्ये कळावे यासाठी ही भूमिका व हा निर्णय घ्यावा लागत आहे.
माळशिरस प्रतिनिधी
सचिन रणदिवे