भाजपवाशी मोहिते पाटील यांना महार,बौद्ध,मातंग समाजाचे वावडे
प्रतिनिधी—सदाशिवनगर—महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका थोडयाच दिवसांवर येवून ठेपलेल्या असताना माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच चालू असून,या मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम जानकर निवडणूक लढवीत आहेत,
ही निवडणूक रंगतदार तर होणारच आहे,मात्र या मतदारसंघात उत्तम जानकर यांनी जात चोरली अशी चर्चा दलित समाजामध्ये आहे,मात्र उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला हा मुबंई उच्च न्यायालयाने मंजूर केल्यामुळे त्यांनी जात चोरली नसल्याची काही लोकांची भावना आहे व काहींची जानकर यांनी जात चोरल्याची भावना आहे,ही परिस्थिती वगळता माळशिरस तालुक्यातील विरोधकांची मूठ बांधण्यात उत्तम जानकर यांना यश मिळाले आहे, त्याच बरोबर मोहिते पाटील यांच्या घरातील सदस्य डॉ धावलसिंह मोहिते पाटील यांना आपल्या बरोबर आणण्यात उत्तम जानकर यांना यश मिळाले आहे, त्यामुळे माळशिरस तालुक्यातील विरोधक व डॉ धवलसिंह मोहिते पाटील एकत्र येऊन उत्तम जानकर यांचा प्रचार करीत असल्याने उत्तम जानकर यांचे पारडे जड झाले असल्याचे सद्या तरी चित्र निर्माण झाले आहे,
भाजपचे उमेदवार हे आयात उमेदवार आहे,अशा प्रकारचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून चालू असून उमेदवार जरी आयात केलेला असला तरी मोहिते पाटील यांची या तालुक्यात नेहमीच आघाडी व त्यांच्या गटाचा आमदार म्हणून निवडून आलेला आहे,राम सातपुते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्याची चर्चा असून त्यांच्या बद्द्ल दलित व मुस्लिम समाजातील जनतेमध्ये नाराजी पसरलेली दिसून येत आहे, हा मतदारसंघ जरी मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असला तरी या उमेदवारांवर दलित,मुस्लिम समाज नाराज असल्याने मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला डेंजर झोन मध्ये असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसतेय
मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यातील चळवळीमध्ये काम करणारा महार,बौद्ध,मातंग समाजाचा उमेदवार मिळाला नाही का?असा प्रश्न विचारला जात आहे, त्यांना फक्त चांभार समाज का दिसतोय हा ही प्रश्न उपस्थित होत आहे,म्हणजे भाजपवाशी मोहिते पाटील यांना महार,बौद्ध,मातंग समाजाचे वावडे असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.
उत्तम जानकर हे भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असल्याने या तालुक्यातील विरोधक व डॉ धवलसिंह मोहिते पाटील फत्तेसिंह माने पाटील,पांडुरंग देशमुख तसेच त्यांचे अकलूजमध्ये कट्टर विरोधक म्हणू ओळखले जाणारे किरण साठे हेही त्यांच्या बाजूने उभे राहिले असल्याचे दिसून येत आहे,त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये उत्तम जानकर निवडून येऊन या माळशिरस तालुक्यात परिवर्तन अटळ असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे,
चौकट
भाजपवाशी मोहिते पाटील यांना महार,बौद्ध,मातंग समाजाचे वावडे आहे,भाजप मधील मोहिते पाटील यांना चलवळीमधील या वरील समाजामधील कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी का वाटले नाही,ज्या समाजाची दलित चळवळीत काहीच योगदान नाही आशा समाजाचा व्यक्तीला उमेदवारी देऊन महार,बौध्द,मातंग समाजाचा त्यांनी अपमान केला आहे, त्यांना या निवडणुकीत हा समाज त्यांची जागा दाखवल्याशिवय शांत बसणार नाही
विकास बनसोडे—सदाशिवनगर