उत्तम जानकर व राम सातपुते यांचा उदय कांबळे अडसर ठरणार

उत्तम जानकर व राम सातपुते यांचा उदय कांबळे अडसर ठरणार

प्रतिनिधी—-अकलूज–माळशिरस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवाराला बहुजन ब्रिगेडचे उदय कांबळे अडसर ठरण्याची शक्यता असून बहुजन ब्रिगेड संघटनेची ताकद माळशिरस तालुक्यामध्ये असून संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांचा प्रत्येक गावामध्ये संपर्क असून संघटनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये असून या संघटनेच्या मतांचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम जानकर यांना बसणार का? किंवा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे,नुकतेच त्यांनी संघटनेचा माळशिरस येथे मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी अशीच भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

माळशिरस मतदारसंघात ही निवडणूक फार चुरशीची होणार असून दोन्ही उमेदवारांना एक-एक मत महत्वाचे ठरणार आहे, त्यामध्ये अनेक पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ही निवडणूक मोहिते पाटील व उत्तम जानकर यांच्या अस्तित्वाची बनली आहे. ह्या निवडणुकीरवरून मोहिते पाटील व जानकर यांचे भवितव्य अवलंबून असताना या निवडणुकीत बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी २०१४ची विधानसभा निवडणूक लढवली आहे,त्यामुळे त्यांना निवडणुकीचा संपूर्ण अनुभव असून तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये किरण साठे यांना ओळखणारी जनता असून त्यांनी त्यांच्या संघटनेचा अपक्ष उमेदवार म्हणून उदय कांबळे यांना उभा केल्याने हा उमेदवार कोणाची मते खाणार?व कोणाच्या विजयाला अडसर ठरणार?हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom