माळशिरस तालुक्यात खळबळ !
कुणी केले सरकारी जमिनीवर अतिक्रमण ?
पहा कोण करणार विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन
प्रतिनिधी : माळशिरस : माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी गावातील भूमापन व उपविभाग क्रमांक 556 मध्ये अतिक्रमण केलेल्या व्यक्तीवर तात्काळ तडीपार करून मोक्का अंतर्गत कारवाई करून अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी पुणे विभागाचे आयुक्त डॉ सौरभ राव,सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली आहे.माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी गावातील भूमापन व उपविभाग क्रमांक 556 या गटातील सरकारी शेतीत,जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून बागायत शेती केली जात आहे. त्यामध्ये अनेक वर्षे झाली अतिक्रमण करून शेती कसून त्यामधून उत्पन्न मिळवले जात असून,महसूल विभागाकडून त्या अतिक्रमणधारकवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
अतिक्रमणधारक हा शेतीच्या माध्यमातून अनेक वर्षे झाली उत्पन्न मिळवत आहेत,सरकारी शेतात अतिक्रमण करून सरकारपेक्षा स्वतः मोठे सरकार असल्यासारखे वागत आहेत,त्यामुळे त्यांची कृती ही सराईत गुंडापेक्षा भयंकर असून जो सरकारला व शासनाला जुमानत नाही अशा शासकीय आणि सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याऱ्या अतिक्रमण धारकावर तात्काळ तडीपार करण्याची कारवाई करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे.अतिक्रमण धारक यांनी जेवढया दिवस अतिक्रमण करून शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविले आहे ते वसूल करण्यात यावे किंवा त्याच्या स्वतःच्या आणि घरातील व्यक्तीच्या नावे असलेल्या जमिनीवर बोजा चढवावा तसेच अतिक्रमण धारकाने केलेले अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यात यावे आणि संबंधित अतिक्रमण धारकवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करून किरण साठे यांनी २८ मार्चला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.किरण साठेंच्या तक्रारीने माळशिरस तालुक्यात खळबळ उडाली आहे,अतिक्रमण कुणी केले आहे ? याची जोरदार चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये चालू आहे,तसेच अतिक्रमण धारकावर कोणती कारवाई करण्यात येणार ? याची उत्सुकता जनतेमध्ये निर्माण झाली आहे.