असंवेदनशील पालकमंत्री विखे पाटील यांची हकालपट्टी करा – किरण साठे
राष्ट्रवादीसह बहुजन ब्रिगेडची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
पुणे पॅटर्न प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कार्यरत असलेले महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे असंवेदनशील असून त्यांनी नुकताच माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला.सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माळशिरस तालुक्यात कार्यक्रमानिमित्त आले होते.कार्यक्रमाच्या ठिकाणापासून गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेली गावे हाकेच्या अंतरावर असताना त्यांनी पाहणी केली नाही.त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल असंवेदनशीलता दाखवली आहे त्यामुळे त्यांच्यावर तालुक्यातील जनतेमध्ये आणि शेतकरी यांच्यामध्ये नाराजी पसरली असून आशा असंवेदनशील पालकमंत्री यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
नुकसानीची पाहणी न करता सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्यांचं काम उरकून ते मुंबईला मार्गस्थ झाले पालकमंत्री या नात्याने माळशिरस मध्ये नियोजित कार्यक्रम असताना त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीची पाहणी करणं अपेक्षित असताना शेतकऱ्यांच्या झालेला नुकसानीकडे दुर्लक्ष केले आहे ही असवेदनशीलता असून त्यांना शेतकऱ्यासंबंधातील नुकसानीच्या बाबतीत कोणतेही घेणेदेणे नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांना दिसला नाही त्या कृतीवरून त्यांची शेतकऱ्या प्रति असलेली भावना लक्षात येत आहे म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सह बहुजन ब्रिगेड संघटनेने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख,शहर उपाध्यक्ष इरफान बागवान, हनुमंत पाटोळे,सचिव जुबेर बागवान,सरफराज बागवान,फरीद बागवान, इत्यादी उपस्थित होते.
