भाजपने येणाऱ्या निवडणुकीत सावरकर यांच्याच नावाने मते मागावीत – किरण साठे
भाजपने नसते फालतू उद्योग करून जनतेला फसवू नये
शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमनावर भाजपने खुलासा करावा…
प्रतिनिधी : लवंग : भारतीय जनता पक्षाच्या काळात महागाईने मोठ्या प्रमाणावर उच्चांक गाठला आहे.भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आले आहे की,महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे,एप्रिलमध्ये अजून महागाईचा भडका उडणार आहे,त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेला सावरकरांच्या मुद्यावर वेढ्यात काढून महागाईवरचे लक्ष विचलित करण्यासाठी मी सावरकर टॅग लाईन चालू करून सावरकर गौरव यात्रा कार्यक्रम आयोजित केला आहे.असले फालतू उद्योग करून जनतेला फसवण्याचे काम चालू केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी केला आहे.
सावरकरांनी अनेक महामानव यांच्या बद्दल अपमानास्पद लिखाण केले असून महामानवांच्या अपमानापेक्षा राज्यातील भाजप नेत्यांना सावरकर यांचा अपमान मोठा वाटावा ही शोकांतिका आहे,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करीत असताना माळशिरस तालुक्यातील आमदार झोपले होते का ? त्यावेळी या आमदारांनी आणि भाजपमधील आमदार यांनी मी शिवाजी महाराज,मी डॉ बाबासाहेब आंबेडकर, मी महात्मा फुले अशी टॅग लाईन का ठेवली नाही,अशा प्रश्न किरण साठे यांनी तालुक्यातील आणि भाजपमधील आमदारांना विचारला आहे.
भाजपने सावरकर गौरव यात्रा काढल्यानंतर सावरकरांच्या नावानेच मते मागावीत,सावरकर यांच्या नावावरच निवडणुका लढवाव्यात निवडणुकीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती मते मागू नयेत,ही ठोस भूमिका भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र मध्ये घेतली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांपेक्षा सावरकर मोठे वाटत आहेत त्यामुळे सावरकर गौरव यात्रा काढणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, महामानवांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जनता निश्चित त्यांची जागा दाखवेल असा घनाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी केला आहे.
