माळशिरस तालुक्यातील सामाजिक संघटनांमुळे अधिकारी व ठेकेदार,पोट ठेकेदार यांच्या बुडाला लागली आग
सामाजिक संघटनेवर आरोप करणारे अधिकारी व ठेकेदार,पोट ठेकेदार यांची माजलेल्या बोकडासारखी अवस्था-सचिन रणदिवे
प्रतिनिधी : माळशिरस : माळशिरस तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहेत या कामावरती माळशिरस पंचायत समिती उपअभियंता बांधकाम विभाग या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संबंध तालुका भर रस्ता खडीकरण,मुरमीकरण, डांबरीकरण, सिमेंट काँक्रीट अशी विविध प्रकारचे कामे प्रगतीपथावर असतानाच माळशिरस तालुक्यातील काही भागांमध्ये संबंधित अधिकारी व ठेकेदार हे इस्टिमेट मॅनेज करून प्लेअर मध्ये लाखो रुपयेचा भ्रष्टाचार करून आपली पोळी भाजण्याचे काम करत आहेत. सामाजिक संघटनांमुळेच या ठेकेदार,पोट ठेकेदार,व अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे त्यातच काही माजलेले समाजकंटक हे हप्तेखोर संघटनेमुळे अधिकारी परेशान अन ठेकेदार हैराण तर विकास कामांना लागला ब्रेक असे बिन बुडाचे आरोप सामाजिक संघटनेवरती करताना दिसून येत आहेत त्यातच माळशिरस तालुक्यात नेमकं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलर करणाऱ्यांचा सुळसाळाट ही लकाही वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसारित करत आहेत पण खरे ब्लॅकमेलर हे कोण हे त्यांचे त्यांना समजत नाही? अधिकारी हे ठेकेदाराला हाताशी धरून जनतेच्या पैशावर डल्ला मारून आपण सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे धंदा या अधिकारी व ठेकेदारांनी मांडला आहे.असा सनसनाटी आरोप दलित महासंघाचे सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी केला आहे.
सामाजिक संघटने वरती बिनबुडाचे आरोप करणाऱ्यां अधिकारी व ठेकेदार,पोट ठेकेदार यांची माजलेल्या बोकडाच्या वरची अवस्था झालेली दिसून येत आहे.असेही सचिन रणदिवे यांनी म्हटले आहे.अधिकारी व ठेकेदार,पोट ठेकेदार यांनी केलेल्या सर्व कामांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी सामाजिक संघटना रस्त्यावर उतरणार आहेत असे दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी सांगितले.
