अकलूज ते पुणे अवैद्य प्रवासी वाहतूक कायमची बंद करण्याची मागणी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालासमोर १५ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन
प्रतिनिधी : अकलूज : अकलूज मधून होणारी अकलूज ते पुणे ही अवैद्य वाहतूक कायमची बंद करण्याची मागणी बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देवून केली आहे.
अकलूज मधून अकलूज ते पुणे अशी अवैद्य वाहतूक चालू असून ती तात्काळ कायमची बंद करण्यात यावी.ही वाहतूक करणारे वाहनधारक प्रवासधारकाना मोठ्या प्रमाणावर लुटण्याचे काम करीत आहेत,त्यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात भर पडली असल्याचे दिसून येत आहे.असे निवेदनात नमूद केले आहे.
एसटी महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा जास्त दर घेऊन ही वाहतूक चालू आहे,आर टि ओ नियमांची पायमल्ली करून ज्यादा सिटे भरून वाहतूक करून प्रवाशांचे जीव धोक्यात घालून हा प्रवास चालू आहे तरी ही अवैद्य वाहतूक तात्काळ कायमची बंद करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक १५/८/२२ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेने दिला आहे.
संपूर्ण विषयाची माहिती घेतल्यानंतर अकलूजमधील एक शासकीय कार्यालय अकलूज ते पुणे अवैद्य वाहतूक करणाऱ्या गांधी चौकातील गाड्या धारकाकडून महिन्याला जवळपास ४० ते ५० हजार रुपये हप्ता गोळा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळेच एक शासकीय कार्यालय या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे,मात्र बहुजन ब्रिगेड संघटना इंदापूर, पोलीस स्टेशन,बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे निवेदन देवून ही अवैद्य वाहतूक कायमची बंद करणार आहे.आणि जे कार्यालयाल हप्ता घेत आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
