बहुजन ब्रिगेड संघटनेच्या मागणीला मिळाले यश

बहुजन ब्रिगेड संघटनेच्या मागणीला मिळाले यश

पंढरपूर ते मेंढापुर मार्गे पांढरेवाडी एसटी झाली चालू

प्रतिनिधी : पंढरपूर : पंढरपूर एसटी डेपोचे आगार व्यवस्थापक यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी निवेदन देवून पंढरपूर ते मेंढापुर मार्गे पांढरेवाडी मार्गावरती एसटीच्या दिवसातून तीन फेऱ्या चालू करण्याची मागणी केली होती.

मेंढापुरची लोकसंख्या ५ ते ६ हजार असून या गावच्या आसपास अनेक वाड्यावस्त्या व लोकवस्त्या आहेत तसेच मेंढापुर गाव पालखी महामार्गावर असल्याने मागील अनेक दिवसांपासून एसटी बंद असल्याने प्रवाशांची अडचण झाली असल्याचे निवेदनात म्हटले होते.बहुजन ब्रिगेड संघटनेने केलेल्या मागणीची एसटी आगार व्यवस्थापक श्री लाड यांनी दखल घेऊन एसटी चालू केल्याने बहुजन ब्रिगेड संघटनेच्या मागणीला आणि जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.एसटी चालू झाल्याने बहुजन ब्रिगेड संघटनेचे मेंढापुर व पांढरेवाडी गावातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom