माळशिरस तालुक्यातील जनतेने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्याची गरज–संतोष उर्फ आप्पाराजे शिंदे

माळशिरस तालुक्यातील जनतेने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्याची गरज–संतोष उर्फ आप्पाराजे शिंदे

प्रतिनिधी—पिंपरी-चिंचवड

देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातलेला असल्यामुळे राज्यासह देशामध्ये लॉक डाउन व संचारबंदी केली आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जवळजवळ राज्यामध्ये नऊशे च्या आसपास आकडा गेला असल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेने या कोरोना ला गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष संतोष उर्फ आप्पाराजे शिंदे यांनी म्हटले आहे. लॉक डाउन व संचारबंदी ही लावण्यापाठीमागचे कारण की या कोरोना व्हारासचा संसर्ग वाढू नये आणि याची लागण इतरान होऊ नये म्हणून राज्य सरकारने या कोरोना व्हारासचा अटकाव करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत त्या दिलेल्या सूचना ह्या आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिल्या आहेत,त्यामुळे आपल्या तालुक्यातील जनतेने या संचारबंदी चा व लॉक डाउन चे उल्लंघन न करता घरात बसून या कोरोना वर मात करण्यासाठी आपण सरकारच्या सूचनांचे पालन करून माळशिरस तालुक्यातील जनतेने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य याला या कोरोनाची लागण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष संतोष उर्फ आप्पाराजे शिंदे यांनी माळशिरस तालुक्यातील जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom