
सदाशिवनगर ग्रामपंचायत कर्मचारी यांची आरेरावी खपवून घेणार नाही–ऋषिकेश बनसोडे
सदाशिवनगर प्रतिनिधी :-
सदाशिवनगर ग्रामपंचायत येथील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या साठी गेलो असता ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद भोसले यांनी आरेरावीची भाषा करून धक्का बुक्की केली आहे असे बहुजन ब्रिगेड संघटनेचे जिल्हा सचिव ऋषींकेश बनसोडे यांनी यावेळी सांगितले. सर्व नागरीक संचारबंदीचे नियम पाळत आहेत व ग्रामपंचायत कर्मचारी कोणतीही खबरदारी न घेता रस्त्याने मोकाट फिरत आहेत सदाशिवनगर येथे ग्रामपंचायत च्या वतीने औषध फवारणी व इतर समस्या आहेत त्या साठी मी ग्रामसेवक यांना भेटण्यासाठी गेलो आसता त्या ठीकाणी प्रसाद भोसले हा कर्मचारी होता त्या वेळी मि विवीध प्रश्नावर बोलत आसत ना त्याने मीच ग्रामसेवक आहे तुला काय करायचं आहे ते कर कुणाकडे जायचंय तिकडे जा माझी कुणीही वाकडी करत नाही व मला धक्का बुक्की केली व मला जे वाटतंय ते मी करेन असल्या भाषेत बोलून जे कृत्य केले आहे त्याच्यावर कारवाई करावी व सदाशिवनगर मधील सर्वसामान्या नागरीकांची याच्या जाचातून सुटका करावी तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने केलेल्या निकृष्ठ कामा संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी बहुजन ब्रिगेड जिल्हा सचिव ॠषीकेश बनसोडे यांनी सांगितले