माळशिरस तालुक्याचे प्रमुख लोकप्रतिनिधी यांना वाळू माफियाकडून मंथली मिळत असल्याची तालुक्यामध्ये खमंग चर्चा

माळशिरस तालुक्याचे प्रमुख लोकप्रतिनिधी यांना वाळू माफियाकडून मंथली मिळत असल्याची तालुक्यामध्ये खमंग चर्चा

प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधीला तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाकडून मंथली हप्ता मिळत असल्याची खमंग चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये ऐकवायस मिळत आहे.

माळशिरस तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी यांनी सर्वसामान्य जनतेला हवेसे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना त्यांना या माळशिरस तालुक्यातील वाळू माफिया यांच्याकडून हप्ता मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती,आणि त्या नुसार विशेष करून पश्चिम भागातील वाळू माफिया यांच्याकडून या प्रमुख लोकप्रतिनिधीना मंथली मिळत असल्याने बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर चालू असून पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना व शासनाचा महसूल बुडविला जात असताना जनतेने निवडून दिलेल्या प्रमुख लोकप्रतिनिधी यांनी या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे असताना शासनाचा एकही लिलाव या माळशिरस तालुक्यात झालेला नसतानाही बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाकडून मंथली घेने त्यांना शोभत नसल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

माळशिरस तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी कोण आहे,याचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या या तालुका वासीयांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडून त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देऊन तालुक्यातील बेकायदेशीर वाळू माफिया यांच्या विरोधात बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभा करणार आहे.

दत्ता कर्चे

प्रमुख संघटक महाराष्ट्र राज्य–बहुजन ब्रिगेड संघटना 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom