बहुजन ब्रिगेडच्या तालुका कार्याध्यक्षपदी विकास बनसोडे
नातेपुते प्रतिनिधी – बहुजन ब्रिगेड संघटना संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेड प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी निवडीचे पत्र देऊन सदाशिवनगर येथील विकास पोपट बनसोडे यांची बहुजन ब्रिगेड संघटना माळशिरस तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात अली.
यावेळी ऋषी बनसोडे,शंकर वाघमारे,सुदाम आवारे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.
