मांडवे ग्रामपंचायत निवडणूक होणार अटीतटीची…
मांडवे प्रतिनिधी- मांडवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जाते गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक विकास कामे झाली पण कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विचारात घेऊन झालेली नसल्याचे काही नागरिकांमधून बोलले जाते हम करे सो कायदा अशी परिस्थिती मांडवे ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळती शासनाचा आलेला निधी हा गावचा कारभारी स्वतःचा पैसा असल्यागत पैशाची उधळपट्टी करत आहे काही वार्डमध्ये नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता देखील नाही तर काही विकास कामांचा चा अभाव दिसत आहे काही रस्ते तर फक्त मेंटेनेस चा बिजनेस म्हणूनच वापर होत आहे प्रत्येक वर्षी त्या रस्त्यांवर मेंटेनन्स साठी पैसे खर्च केले जातात व ते रस्ते दोन महिने सुद्धा टिकत नाहीत तसेच अनेक रस्ते पक्के करण्याचे सोडून त्या रस्त्यांवर प्रत्येक वर्षे मेंटेनेस साठी निधी वापरला जातो वृक्षलागवड असेल पाणीपुरवठा योजना असेल बंदिस्त गटार लाईन असेल हे सर्व भ्रष्टाचारासाठीच्या योजना झाले आहेत असेदेखील सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जाते येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुक अटीतटीची होणार आहे. ग्रामपंचायत मध्ये निवडून येणारे सदस्य हे म्हणजे नावासाठी निवडून येतात अशी परिस्थिती मांडवे मध्ये पाहायला मिळते काही ग्रामपंचायत सदस्यांना तर आपल्या वर्ड मधल्या समस्याच माहीत नाहीत निवडून आल्यानंतर आपले कार्य काय असते हेच माहित नाही फक्त नात्या गोत्या तून निवडून आलेले सदस्य अशीच परिस्थिती मांडवे परिसरामध्ये आहे अशा नात्यागोत्यातून निवडून आलेल्या सदस्यांमुळे अनेक वार्डमधील नागरिकांना आपली समस्या कोणाकडे मांडावी हेच माहित नाही आणि विरोधक तर फक्त निवडणूक आली की घरातून बाहेर निघतात त्यामुळे सत्ताधारी पॅनल प्रमुख हे हम करे सो कायदा याप्रमाणेच वागत आहेत मांडवे परिसरातील प्रशासकीय अधिकारी तर चिरी मिरी साठी आपले पद काय आपण वागतो काय याचे भानच राहिले नाही अशी परिस्थिती मांडवे ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळती त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मेळच राहीला नाही त्या मुळे नागरिकांना समस्या घेऊन जायचं कुणाकडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या मुळे
येत्या निवडणुकीत तिसरी आघाडी पहायला मिळालीतर नवल वाटू नये.
चैकट… मांडवे गावा मध्ये अनेक वस्त्यांमध्ये रस्त्याची समस्या ही मोठी समस्या बनली आहे गावांमधील हम करे सो कायदा मोडीत काढण्याचे काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे शासकीय अधिकाऱ्यांची मुजोरी ही मोडीत काढणार आहे व मांडवे परिसरातील नागरिकांना योग्य सुख सुविधा मिळवून देणार आहे तसेच झालेल्या भ्रष्टाचाराचा हि पर्दाफाश करणार आहे…दत्ता कर्चे.. सामाजिक कार्यकर्ते मांडवे
