माळशिरस गटविकास अधिकारी यांच्या विरोधात मुख्यकार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार:दत्ता कर्चे
प्रतिनिधी सोलापूर :- माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर,अकलूज,आनंदनगर,यशवंतनगर या ग्रामपंचायत मध्ये श्री सावळजकर,मुंगूस्कर,यांच्या प्रशासकीय बदल्या होऊनसुद्धा ते बऱ्याच वर्षापासून वरील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहेत त्या ठिकाणी आर्थिक व प्रशासकीय अनियमितता होण्याची शक्यता वाटत असल्या मुळे खालील ग्रामसेवकांचे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामकाजाची दप्तर तपासणी करण्यात यावी,तसेच सद्या विस्तार अधिकारी म्हणून आपल्या कार्यालयात काम पाहणारे श्री के व्ही खरात हे त्यांची नेमून दिलेली कर्तव्य जबाबदाऱ्या योग्य रित्या पार पाडत नसल्याने त्यांनी ग्रामसेवक असताना काम केलेल्या,कण्हेर,मांडकी,भांबुर्डी,जाधववाडी,इस्लामपूर या ग्रामपंचायत च्या कामकाजाची संपूर्ण दप्तर तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी माळशिरस पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे,सोलापूर जिल्हा सचिव माऊली धाइंजे,अभिजित रणदिवे,चिक्या बनसोडे इत्यादी उपस्थित होते.आंदोलनाला शिवसेनेच्या वतीने विरेंद्र वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमाजी मिसाळ,नाभिक महामंडळ चे वसंत सूर्यवंशी,जाधववाडी ग्रामपंचायत मा उपसरपंच विद्यमान सदस्य नाथाजी ढेबरे,रामचंद्र जानकर,दत्तू वाघमोडे, मांडकीचे अभिजीत केंगार संदीप खंदारे यांनी पाठिंबा दिला.
‘चौकट’
आंदोलनकर्ते आंदोलनाला बसल्याचे पाहून माळशिरस गटविकास अधिकारी यांनी कार्यालायमधून काढता पाय घेऊन निघून जाण्याचा मार्ग स्वीकारल्याने गटविकास अधिकारी या संबंधित ग्रामपंचायत व अधिकारी यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप दत्ता कर्चे यांनी केला आहे.गटविकास अधिकारी यांच्या विरोधात मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही कर्चे यांनी सांगितले.
