अकलूज,संग्रामनगर,यशवंतनगर,आनंदनगर ग्रामपंचायत च्या चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

अकलूज,संग्रामनगर,यशवंतनगर,आनंदनगर ग्रामपंचायत च्या चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

माळशिरस:प्रतिनिधी:

गटविकास अधिकारी माळशिरस तालुका यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकलूज,संग्रामनगर,आनंद नगर,यशवंतनगर या ग्रामपंचायतच्या संपूर्ण कामाजाची दप्तर तपासणी करण्याची मागणी सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे,यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख उपस्थित होते,निवेदन माळशिरस पंचायत समितीचे ओ एस कदम यांनी स्वीकारले.

माळशिरस तालुक्यातील अकलूज, यशवंतनगर, संग्रामनगर,आनंदनगर या ग्रामपंचायतच्या 2011 पासून ते मार्च 2021 पर्यंत च्या संपूर्ण कामकाजाची दप्तर तपासणी करण्यात करावी,संबंधित ग्रामपंचायत मध्ये गेल्या दहा वर्षांत प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता असून या ग्रामपंचायतीची संपूर्ण कामकाजाची दप्तर तपासणी केल्यानंतर हे सत्य बाहेर येणार असून आपण याची तात्काळ दखल घेऊन याची चौकशी सुरू करण्याची मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे,तसेच तात्काळ चौकशी सुरू न केल्यास माळशिरस पंचायत समितीच्या समोर 11 एप्रिल 2021 पासून शासकीय वेळेमध्ये तीव्र स्वरूपात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom