
प्रतिनिधी : माळखांबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. नितीन तानाजी साठे यांची, तर शिक्षण तज्ज्ञ सदस्य म्हणून श्री. सतीश आप्पा, आणि सदस्य म्हणून श्री.अनिल जावीर व श्री. बिभीषण साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या नवनियुक्त समितीचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख मा.श्री.किरण साठे यांच्या हस्ते अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे हार व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, महेश साठे,अतिश साठे, विशाल साठे, नितीन सरतापे, सागर सरतापे, लक्ष्मण चव्हाण यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष लक्ष केंद्रित करणे.डिजिटल वर्गखोल्या,पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतागृहांची उत्तम सोय करणे.क्रीडा,कला आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे.शासकीय योजना आणि शालेय निधीचा योग्य विनियोग करून शाळेचा कायापालट करणे.नवनियुक्त अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना या माळखांबी शाळेच्या विकासात्मक कामांसाठी आणि पुढील वाटचालीस महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. देण्यात आल्या.