कोल्हापुरात आज रंगणार एसटी सवलत ‘NCMC स्मार्ट कार्ड’ शिबिर; महाराष्ट्र विकास सेनेचा मोठा पुढाकार!

कोल्हापूरकराना जाहीर आवाहन!

कोल्हापूर (प्रतिनिधी): सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुकर आणि सवलतीचा व्हावा यासाठी महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. राजेशजी खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे ‘एसटी सवलत शासनमान्य NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणी शिबिर महाराष्ट्र विकास सेना पार्टी महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा सौ. काजळताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित केले गेले आहे.हे शिबिर आज सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत पन्हाळकर गल्ली, विचारे माळ येथे पार पडत आहे. या जनहितार्थ कार्यक्रमाला महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.समीरजी मुजावर, दिग्दर्शक तुषार नाईक नवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरही या प्रसंगी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.महिला व पुरुषांना एसटी प्रवास पूर्णपणे मोफत.६५ वर्षे व त्यापुढील पुरुष: एसटी तिकीट दरात थेट ५०% सवलत.१८ ते ७५ वयोगटातील महिला: सर्व महिला प्रवाशांना तिकिटात ५०% सवलत.डिजिटल ‘NCMC’ या शिबिरात मिळणारे कार्ड अत्याधुनि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.नागरिक UPI किंवा रोख रकमेद्वारे वॉलेट頂-अप करून थेट ‘टॅप’ करून डिजिटल पेमेंट करू शकतील. कार्डवर आधार कार्डनुसार अधिकृत नाव आणि फोटो असेल. या कार्डसाठी केवळ २५० रुपये नाममात्र शुल्क आकारले जात आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी स्वतः उपस्थित राहून सोबत आधार कार्ड (ओळख व वयाचा पुरावा), मोबाईल फोन आणि जुने सवलत कार्ड (असल्यास) आणणे आवश्यक आहे.जिल्हा अध्यक्षा काजळताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या उपक्रमाचा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी आजच जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन काजलताई कांबळे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी नागरिकांनी मो. ७५५८६३८०७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom