खासदार सुप्रिया सुळे अन् धैर्यशील मोहिते-पाटलांनी पाळला शब्द; महाराष्ट्र विकास सेना पार्टीला दिलेले ‘ते’ आश्वासन केले पूर्ण!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंसह महाराष्ट्रातील महामानवांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या;पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे थेट मागणी!

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊसाठेयांना’भारतरत्न’ पुरस्कार देऊन त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या लोकसभा गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी थेट देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली आहे.महाराष्ट्र विकास सेना पार्टीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत दोन्ही खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भातील मागणीचे निवेदन सोपवले. या भेटीमुळे दोन्ही खासदारांनी महाराष्ट्र विकास सेना पार्टीला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, यासाठी महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी थेट संपर्क साधून या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हा विषय थेट देशाच्या पंतप्रधानांसमोर मांडण्याचे सकारात्मक आश्वासन किरण साठे यांना दिले होते.दुसरीकडे,माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडेही महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या वतीने जाहीर मागणी करण्यात आली होती. यामध्ये पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे, संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे आणि युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार मोहिते-पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही या शिष्टमंडळाला सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. १० ऑगस्ट रोजी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र विकास सेना पार्टीला दिलेले आपले आश्वासन शब्दशः पूर्ण केले आहे.महात्मा जोतीराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.या सर्व महापुरुषांचे विचार आणि कार्य अखंड देशासाठी आजही दिशादर्शक असून,त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अधिकार आहे,अशी स्पष्ट भूमिका खासदारांनी पंतप्रधानांकडे मांडली.वंचित,शोषित आणि कामगार वर्गाचा आवाज जगासमोर मांडणाऱ्या अण्णाभाऊ साठेंना आणि महाराष्ट्राच्या इतर युगपुरुषांना ‘भारतरत्न’ मिळणे हा ऐतिहासिक निर्णय ठरेल, अशी भावना खासदारांनी व्यक्त केली.या भेटीत सुप्रिया सुळे (बारामती मतदारसंघ)डॉ. अमोल कोल्हे (शिरूर मतदारसंघ)निलेश लंके (अहमदनगर मतदारसंघ)बजंरग सोनवणे (बीड मतदारसंघ)सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे (भिवंडी मतदारसंघ)भास्कर भगरे (दिंडोरी मतदारसंघ)धैर्यशील मोहिते पाटील (माढा मतदारसंघ)अमर काळे (वर्धा मतदारसंघ) उपस्थित होते.सुळे आणि मोहिते पाटील या दोन्ही बड्या खासदारांनी दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करून ही मागणी देशाच्या सर्वोच्च पातळीवर मांडल्यामुळे, महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि समाजबांधवांनी दोन्ही खासदारांचे विशेष आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom