माळखांबीत मविसे पक्षाचे आमरण उपोषण

माळखांबीत मविसे पक्षाचे आमरण उपोषण

अवैद्य दारू बंदी,विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे व माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व माळखांबी शाखेचे अध्यक्ष सागर सरतापे,उपाध्यक्ष महादेव साठे यांच्या नेतृत्वाखाली माळखांबीत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी माळखांबी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.एकीकडे तालुक्यात आमसभा तर दुसरीकडे माळखांबीत अवैद्य दारू बंदीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याने तालुक्यातील जनतेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.उपोषणादरम्यान माळखांबी गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी,अवैध दारू विक्री करणाऱ्या वरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी,माळखांबी ग्रामपंचायत च्या वतीने दारूबंदीचा ठराव तात्काळ करण्यात यावा आशा मागण्या करण्यात आल्या आहेत. माळखांबी गावातील अवैद्य दारू विक्री बंद करण्याच्या व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाची दखल माढा विधानसभा सदस्य अभिजित पाटील यांनी माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेल्या आमसभेत घेतली आणि दारू बंदी झाली पाहिजे अशी सूचना राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.मात्र माळखांबी गावातील ग्रामस्थ,महिला व महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दारू बंद झाल्याशिवाय आणि दारू विकणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom