


माळखांबीतील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट,ग्रामपंचायतचे लेखी पत्र,मात्र उपोषणकर्ते ठरावाची प्रत देण्यावर ठाम,
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळखांबी तालुका माळशिरस येथे मळखांबी गावातील अवैद्य दारू विक्री कायमची बंद करण्यात यावी दारू विक्री करणाऱ्या वरती कारवाई करण्यात यावी माळखांबी ग्रामपंचायत च्या वतीने दारूबंदीचा ठराव तात्काळ करण्यात यावा या मागणीसाठी 26 मे पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणाला माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे माढा विधानसभा अध्यक्ष बिबीशन साठे,शाखा अध्यक्ष सागर सरतापे उपाध्यक्ष महादेव साठे हे उपोषणाला बसले आहेत. त्यांना साथ देण्यासाठी गावातील ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे.गेली दोन दिवस झाले महिला उपोषणात सहभागी झाल्या आहेत.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईचा अहवाल व माहिती देण्यासाठी दुय्यम निरीक्षक श्री भोसले यांनी उपोषणाला भेट दिली.उपोषणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेतली आहे.तसेच माळखांबी ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामसेवक व सरपंच यांनी २९ तारखेला ग्रामसभा घेवून दारू बंदीचा ठराव करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिले आहे. मात्र उपोषणकर्ते यांनी ठराव हातात आल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे सांगीतले आहे.दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले आहे.