
सराटी बावडा टोलप्रश्नी,महाराष्ट्र विकास सेना पक्ष आक्रमक
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने सराटी टोल नाका येथे २७ मे ला तीव्र आंदोलन
रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाका बंद करण्याची अथवा स्थानिकांना टोल मुक्त करण्याची मागणी
प्रतिनिधी : पंढरपूर विभागाचे महाप्रबंधक (तक)एवं परियोजना निदेशक प.का.ई,श्री केशव.वि.घोडके यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे सरचिटणीस अविराज माने यांनी निवेदन देवून सराटी येथील टोल नाका रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावे अथवा २० किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या रहिवाशांना टोल मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे सदर मागणी मान्य न केल्यास २७ मे रोजी टोल नाका येथे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र विकास सेना शेतकरी सेनेचे अध्यक्ष हनुमंत शिंदे यांच्या सह अनेजण उपस्थित होते.
पुढे निवेदनात,संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर असलेल्या बावडा तालुका इंदापूर येथील टोल नाका सुरू करण्यास बीड येथील हुले कन्स्ट्रक्शनला वर्क ऑर्डर दिली असल्याचे नमुद केले आहे.आपण ही वर्क ऑर्डर देत असताना आपण रस्त्याचे काम पूर्ण झाली असल्याची तपासणी किंवा खातरजमा नक्कीच केली असेल.आपल्या वर्क ऑर्डर मध्ये इंदापूर ते तोंडले या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी टोल आकारला जाणार आहे,इंदापूर ते तोंडले या रस्त्याच्या एकूण आनंतरापैकी इंदापूर तालुक्यातील सराटी,बावडा,वाडापूरी,आणि माळशिरस तालुक्यातील अनके ठिकाणी काम अपूर्ण आहे.असताना आपण ही वर्क ऑर्डर दिलीची कशी याची लेखी स्वरूपात माहिती देण्यात यावी.आणि स्थानिकांसाठी सरकारचे धोरण काय आहे याची माहिती देण्यात यावी आणि संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद ठेवण्यात यावा आणि टोल चालू झाल्यानंतर स्थानिक २० किलोमीटर च्या आतील लोकांना टोल मुक्त करण्यात यावे अन्यथा टोल नाक्यावर दिनांक २७ /०५ /२०२५ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे नमूद केले आहे.