
मारकडवाडी येथे आदिवासी व मेंढपाळ लोकांना आप्पासाहेब मारकड यांच्यावतीने मदतीचा हात
कोरोना या विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले असून सर्व व्यवहार अगदी बंद पडले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांन सह आदिवासी व मेंढपाळ लोकांचे जगणे मुश्कील झाले आदिवासी लोक व मेंढपाळ हे लोक बाहेरगावचे आहेत महाराष्ट्र सरकारने काही गेल्या दिवसांमध्ये आहे आपण आहात त्याच ठिकाणी राहण्याची सूचना केल्यामुळे आदिवासी व मेंढपाळ लोक आहेत त्या ठिकाणीच आपली उपजीविका करत आहेत म्हणूनच लॉक डाउन व संचारबंदी मुळे आदिवासी व मेंढपाळ लोकांवर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून मारकडवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका कोषाध्यक्ष आप्पासाहेब मारकड मित्रपरिवार मारकडवाडी यांच्या वतीने आदिवासी व मेंढपाळ लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका कोषाध्यक्ष आप्पासाहेब मारकड, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजिंक्य भैय्या फुले, माहिती सेवभवी संस्था सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष (पत्रकार) सचिन रणदिवे, प्रज्योत रणदिवे तसेच अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.