मांडवे येथील रस्त्या दुरुस्तीची बहुजन ब्रिगेडची मागणी
मांडवे प्रतिनिधी – मांडवे जिल्हा परिषदेच्या गटातील मांडवे 50 फाटा ते सरपंच वस्ती या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मांडवे जिल्हा परिषद गटाच्या सदस्य संगीताताई मोटे यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या फंडातून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते तरुणांचे आयडॉल काकासाहेब मोटे यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी दिले.
सदर रस्ता आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात येत असून हा रस्ता गेले अनेक वर्षे झाली नादुरुस्त असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला या रस्त्यावरून प्रवास करताना विद्यार्थी जेष्ठ नागरिक शेतकरी रुग्ण यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,त्यामुळे आपल्या फंडातून याची तरतूद करण्यात यावी आणि सर्वसामान्य माणसाला या रस्त्यावरून प्रवास करता यावा ही विनंती. सदर रस्ता काकासाहेब मोटे यांच्या काळात झालेला होता परंतु येत्या वीस वर्षापासून सदर रस्त्यावर कोणत्याही स्वरूपाचा फंड टाकण्यात आलेला नाही त्यामुळे सदर रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे केली. यावेळी सोबत बहुजन ब्रिगेड संघटनेचे जिल्हा सचिव माऊली धाईंजे जाधव वाडी चे प्रगतशील शेतकरी रामभाऊ जानकर उपस्थित होते.
