नातेपुते ग्रामपंचायतीचे पाच उमेदवार बिनविरोध
किंगमेकर मामासाहेब पांढरे यांचा भांड परिवाराने केला सन्मान
प्रतिनिधी सचिन रणदिवे
नातेपुते ग्रामपंचायत मध्ये पाटील आणि देशमुख दोन्ही गटाने नातेपुते मध्ये स्थानिक सर्वपक्षीय आघाडी केलेली होती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 17 उमेदवार आहेत त्यापैकी देशमुख आणि पाटील गटाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे नातेपुते ग्रामपंचायत मध्ये देशमुख आणि पाटील गटाची सलामीला सुरुवात झालेली आहे फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण नातेपुते परिसर दणाणून गेला आहे.
वार्ड क्रमांक 1 सौ सोनल गणेशबापू उराडे, वार्ड क्रमांक 4 बाळासाहेब पांढरे यांच्या मातोश्री रंजना पांढरे, वार्ड क्रमांक 5 अनुराधा भारतराव उराडे ,श्री अजयअंकल भांड, श्री संदीपदादा ठोंबरे अशा पाच उमेदवारांची बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यपदी वर्णी लागलेली आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे नातेपुते परिसर व माळशिरस तालुक्यातून कौतुक केले जात आहे निर्वाचित ग्रामपंचायत बिनविरोध सदस्य यांचा सन्मान देशमुख आणि पाटील गट एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणारे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांनी नूतन सदस्य संदीपदादा ठोंबरे यांचा सन्मान केला त्यावेळी देशमुख पाटील गटातील कार्यकर्ते उपस्थित होते. तर नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब भांड व युवा नेते अक्षयभैय्या भांड यांनी किंगमेकर मामासाहेब पांढरे यांचा सन्मान केला यावेळी उपस्थित सदस्यांना उद्योजक अतुल बावकर यांनीही पेढा भरून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

