डॉ धवलसिंह यांच्याबरोबर आघाडी करून किरण साठे निवडणूक लढणार?
प्रतिनिधी–अकलूज—आशिया खंडातील नंबर एकची असलेल्या अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली एकूण 17 जागा असताना अकलूज ग्रामपंचायत च्या निवडणूकीत एकूण 89 जागेवर अर्ज दाखल झाले आहेत.यामध्ये सत्ताधारी गटाकडून स्वतंत्र पॅनेल उभा करण्यात आला आहे,तसेच जनसेवा संघटनेच्या वतीनेही स्वतंत्र पॅनेल उभा करण्यात आला आहे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी वार्ड नंबर 1,वार्ड नंबर 3,वार्ड नंबर 6 मध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत.
गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनसेवा संघटनेचा एक उमेदवार वार्ड नंबर 5 व माने पाटील यांच्या कुटुंबातील एक उमेदवार वार्ड नंबर 2 मधून निवडून आलेला होता.त्यावेळी किरण साठे यांनी सात जागेवर आपले उमेदवार उभे केले होते,माने पाटील यांच्या कुटुंबातील उमेदवार निवडून आलेल्या वार्ड मध्ये त्यांची स्वतःची आई उभी राहिली होती, त्यावेळी त्याठिकाणी मतांचे विभाजन झाले नसल्याने व त्यांच्या आईचा अर्ज माघारी घेतल्याने तो उमेदवार निवडून आला होता,त्याच पद्धतीने वार्ड नंबर 5 मध्येही त्यांचा उमेदवार दिला नसल्याने डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या जनसेवा पॅनेलचा उमेदवार मतांचे विभाजन न झाल्याने निवडून आलेला होता.तसेच वार्ड नंबर 6 मध्ये जनसेवा संघटनेच्या उमेदवाराचा पराभव हा फक्त किरण साठे यांनी उभा केलेल्या उमेदवारामुळे झाला होता.
सद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष असलेले किरण साठे यांनी 2012 साली जिल्हा परिषद,2014 साली माळशिरस विधानसभा,2015 साली अकलूज ग्रामपंचायत,2017 साली पंचायत समिती या निवडणुका लढल्या असल्याने त्यानी अकलूजमधील प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचे काम केले असल्याने अकलूजमधील ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन घडवून आणायचे असल्यास डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर आघाडी करून निवडणूक लढवावी अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये पहावयास मिळत आहे,त्यामुळे अकलूजमधील ग्रामपंचायतची निवडणूक डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बरोबर आघाडी करून किरण साठे लढविणार का?हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
