महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उपोषणाला मिळाले यश

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उपोषणाला मिळाले यश

गटविकास अधिकारी यांनी दिले आश्वासन

दहिगाव मधील प्रलंबित कामे महाराष्ट्र विकास सेना पक्षामुळे होणार पूर्ण

प्रतिनिधी : माळशिरस :

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे दहिगाव शहराध्यक्ष सचिन खिलारे यांनी माळशिरस पंचायत समिती समोर दहिगाव ग्रामपंचायत च्या हद्दीतील विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला २६ जानेवारी रोजी सुरुवात केली होती.सदर उपोषणाच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत दहिगाव माळशिरस यांना लेखी पत्र काढून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा असा आदेश दिला होता.उपोषणाला पक्षप्रमुख किरण साठे यांनी भेट दिली यावेळी शहराध्यक्ष सचिन खिलारे,मविसे प्रदेश सचिव अनिल साठे,धीरज साळवे,रोहित वाघमारे,तात्या खिलारे,बापूराव बुधावले,किरण खंडागळे,मारुती खिलारे,बाबुराव दनाने,बाबुराव खिलारे,सुनील जगताप,किसन खिलारे उपस्थित होते.

त्यानुसार दहिगाव ग्रामपंचायत ने महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे दहिगाव शहराध्यक्ष सचिन खिलारे यांना जल जीवन मिशन योजनेचे बंद पडलेले काम सध्या सुरू असून ते प्रगतीपथावर आहे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी व सुशोभीकरणासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे निधी मागणी केलीअसून निधी उपलब्ध झाल्यावर ग्रामपंचायत मार्फत काम केले जाईल,तसेच स्मशानभूमीची जागेची मोजणी करणे बाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडे मागणी केलेली आहे,अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराची जागा सर्वांनुमते ठरलेली नाही जागेचे ठिकाण कायम झालेवर प्रवेशद्वाराचे काम केले जाईल,अशा पद्धतीचे लेखी पत्र दिले असून २६ जानेवारी रोजी माळशिरस पंचायत समिती समोर करण्यात आलेल्या उपोषणाला प्रत्यक्ष गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन संबंधित प्रकरणाची मी जाणीवपूर्वक चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषण करते यांना विस्ताराधिकारी श्री लोंढे यांनी ज्यूस पासून उपोषण सोडले यामुळे दहिगाव गावांमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष तत्पर असल्याचे या उपोषणातून दिसून आले प्रशासन व सत्ताधारी लोक या प्रश्नाकडे जाणून पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे गटविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे असे महाराष्ट्र विकसन पक्षाचे शहराध्यक्ष सचिन खिलारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom