महाराषमहाराष्ट्र विकास सेना पक्ष माढा लोकसभा निवडणुकीत उतरणार ?
प्रतिनिधी : : महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना काहीच महिन्यांपूर्वी झालेली असून त्या पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे आहेत.ज्यांना राजकारणात येवून १४ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यांनी इतर दोन पक्षात काम केले आहे. त्यामुळे त्यांना राजकारणाचा बराच अनुभव आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे जाळे निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख किरण साठे यांनी कंबर कसली असून संपूर्ण मतदारसंघात पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे,मोठ्या संख्येने मतदारसंघात शाखा बांधणी आणि पदाधिकारी निवडी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.नव्याने स्थापना करण्यात आलेल्या पक्षाला उस्फूर्तपणे पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.मतदारसंघात असलेल्या सांगोला,माळशिरस,करमाळा,
पंढरपूर,माढा,माण,खटाव,फलटण,तालुक्यातील गावागावात शाखा उदघाटन कार्यक्रम पार पडत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा माढा लोकसभा मतदारसंघात झंझावात निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि युवक पक्षाच्या कामाकडे पाहून आकर्षित होताना दिसत आहेत.
पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांची काम करण्याची पद्धत आणि क्षमता सोलापूर जिल्ह्यातील युवा शक्तीला माहिती असल्याने त्यांच्या पक्षाकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येण्याचा कल वाढला आहे.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात महाराष्ट्र विकास सेना पक्ष कोणती भूमिका घेतो ? याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने त्यांच्याकडे दोन इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा केला होता,त्यामुळे पक्ष निवडणुकीत उतरणार की नाही याचाही अंदाज राजकीय विश्लेषकाकांडून बांधला जात आहे.नुकतीच महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत,तिसऱ्या आघाडीत सामील होण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाला मुख्य संयोजक यांच्याकडून निमंत्रण देण्यात आले आहे.मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सांगून तिसऱ्या आघाडीत जायचे की नाही याची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माढा लोकसभा निवडणूक न लढविल्यास तिसऱ्या आघाडीत सामील होणार का ? असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
सद्याचे वातावरण पाहता महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडे युवा वर्गाचा कल मोठ्या प्रमाणात वाढला असून महाराष्ट्र विकास सेना पक्ष या मतदारसंघात निर्णायक आणि महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत पक्षप्रमुख किरण साठे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.तिसऱ्या आघाडीत सामील न झाल्यास आणि माढा लोकसभा निवडणुकीत न उरतल्यास महाराष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी बरोबर जाणार की महायुती बरोबर जाणार हा चर्चेचा विषय बनला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत,भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे,निवडणूक लढविण्याचा आमचा विचार आहे,मात्र उमेदवार चांगला मिळणे अपेक्षित आहे,चांगला उमेदवार मिळाल्यास नक्कीच विचार केला जाणार आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर पक्षप्रमुख किरण साठे यांच्याशी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.मात्र माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्ष निर्णायक आणि महत्वाची भूमिका बाजावणार हे नक्कीच आहे.
अनिल साठे
प्रदेश सचिव – महाराष्ट्र विकास सेना पक्ष
